Manish Jadhav
जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट फक्त दोन लाख असले तरीही तुम्ही कार घेऊ शकता. होय, तुम्ही ऐकलं ते खरं आहे.
आजकाल इलेक्ट्रिक कार, बाईक्सचा जमाना आहे. इलेक्ट्रिक कार, बाईक्स लोक मोठ्याप्रमाणात खरेदी करु लागले आहेत. यातच आता, याकुजा करिष्मा ही याच कॅटेगरीमधील इलेक्ट्रिक कार बाजारात आली आहे.
भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या सर्वात लहान आणि स्वस्त कारच्या यादीत या कारचा समावेश केला जाऊ शकतो.
याकुजा करिश्मा ही एक मिनी इलेक्ट्रिक कार आहे. ही कार बाइकपेक्षाही स्वस्त आहे. ही 3-सीटर इलेक्ट्रिक कार आहे, जी एकदा चार्जिंग केल्यावर 60 ते 70 किलोमीटर अंतर कापू शकते.
ही मिनी इलेक्ट्रिक कार 6 ते 7 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. टाटा नॅनो आणि एमजी कॉमेट ईव्हीला ही कार टक्कर देते.
याकुझा करिश्माची रचनाही विलक्षण आहे. या कारमध्ये स्टायलिश फ्रंट ग्रिल आहे. ही कार अत्याधुनिक एलईडी हेडलॅम्पने सजवण्यात आली आहे. या कारमध्ये एलईडी डीआरएलचाही वापर करण्यात आला आहे.
याकुजा करिश्माची ही बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक कार मल्टी-स्पीड स्मार्ट डिझाइनसह बाजारात उपलब्ध आहे. ही कार अनेक अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. कारमधून तीन जण सहज प्रवास करु शकतात.
याकुजा इलेक्ट्रिक कारची किंमत 1,75,000 रुपये आहे. याकुझा ईव्हीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ही कार बुक केली जाऊ शकते. या कारची बॅटरी क्षमता 60v45ah आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये टाइप-2 चार्जर कनेक्शन देण्यात आले आहे.