Manish Jadhav
गोव्यात दरवर्षी देश-विदेशातील लाखो लोक येतात. खासकरुन गोव्यातील फेस्टिव्हलचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
मॉन्सूनला सुरुवात झाल्यानंतरचा गोव्यातील ख्रिस्ती बांधवाचा ‘सांजाव’ हा पहिला फेस्टिव्हल आहे.
संत जॉन बाप्तिस्ता म्हणजेच जुवांव बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजाव म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात सर्वजण एकत्र येत येऊन चर्चमध्ये प्रार्थना करतात.
सांजाव फेस्टिव्हल दरवर्षी 24 जून साजरा केला जातो. कॅथलिक समुदयातील लोक दरवर्षी हा फेस्टिव्हल साजरा करतात.
ख्रिस्ती बांधव गटागटाने डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात फुलांच्या माळा, हातात माडाच्या झाडाच्या फांद्या आणि वाद्यांचा गजर करत फिरतात.
यावेळी तलाव आणि विहीरीत उड्या मारत ख्रिस्ती बांधव मौजमस्ती करतात. यामध्ये महिला आणि मुलेही सहभागी होतात.
गोव्यातील सांजाव फेस्टिव्हल पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठ्यासंख्येने येतात.