Sameer Amunekar
चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi नं भारतात आपला नवा Xiaomi Pad 7 5G लॉंच केला आहे.
Xiaomi Pad 7 मध्ये 11.2-इंच 2K LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. तसंच, पीक ब्राइटनेस 800 nits आहे. टॅबलेटवर HDR10 आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील उपलब्ध असेल.
टॅबलेटमध्ये 8550mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
टॅबलेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 प्रोसेसर आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड 15 वर आधारित हायपरओएस 2 स्किनवर चालेल.
Xiaomi Pad 7 टॅबलेटचा बेस व्हेरिएंट 27 हजार 999 रुपयाना खरेदी करता येईल. याशिवाय, कीबोर्डची किंमत 8 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोकस पेनची किंमत 5 हजार 999 रुपये आहे.
टॅबलेटमध्ये 13 एमपी रियर कॅमेरा आणि 8 एमपी फ्रंट कॅमेरा फोसेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग आहे.