गोमन्तक डिजिटल टीम
कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई सह कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात.
कोरफड रस पचनतंत्र सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी मदत करते.
कोरफड जेल त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते. मुरुम, पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी उपयुक्त.
जखमा, भाजलेले भाग आणि चट्टे बरे करण्यासाठी कोरफड त्वरेने उपयोगी पडते.
केस गळती कमी करण्यासाठी आणि टक्कल पडण्यास प्रतिबंध करण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे.
कोरफडीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास ही मदत होते.
कोरफड रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.