Manish Jadhav
ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताकडून नंबर 1चा मुकुट हिसकावून घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेची दाणादाण उडवत पॉंइट टेबलमध्ये मोठा उलटफेर केला.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेचा पराभव केला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला.
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109 धावांनी पराभव करत पॉंइट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचे आता 10 सामन्यांत 6 विजयांसह 63.33 टक्के गुण आहेत.
श्रीलंकेच्या पराभवाचा श्रीलंकेला धक्का तर बसलाच पण भारतालाही धक्का बसला. जर श्रीलंकेने हा सामना जिंकला असता तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आली असती आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर घसरली असती.
श्रीलंकेच्या पराभवामुळे भारताचे मोठे नुकसान झाले. पण तरीही भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याला 57.29 टक्के गुण आहेत.