गोमन्तक डिजिटल टीम
‘वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर’च्या अहवालातून जगभरात विविध कारणांमुळे वन्यजीवांची संख्या सातत्याने घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९७० ते २०२० या वर्षांत ती सरासरी ७३ टक्क्यांनी कमी झाल्याचे डब्लूडब्लूएफच्या नवीन अहवालात म्हटले आहे.
अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि प्रदूषणामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.
वाघांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून २०२२ मध्ये देशात ३,६८२ वाघ असल्याचा अंदाज होता.
पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या ६७ टक्क्यांनी तर भारतीय गिधाडांची संख्या ४८ टक्के कमी झाली त्याचप्रमाणे लांब चोचीच्या गिधाडांच्या संख्येतही ८९ टक्के घट झाली आहे.
भारतात पुढाकारातून अधिवास व्यवस्थापन, वैज्ञानिक देखरेख, सार्वजनिक पाठिंब्यासह समुदायांना सहभागी करून घेतल्याने वन्यजीवांची संख्या स्थिर असून काही प्रजातींच्या संख्येत वाढही झाली आहे.
चेन्नईत वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील पाणथळ जागेत ८५ टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे जल पुनर्भरण, पूर नियमनासारख्या गोष्टींवर विपरीत परिणाम झाला.
हवामान बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे स्थानिक व प्रादेशिक स्तरावर मोठ्या बदलांना आमंत्रण मिळू शकते. त्यानंतर परिसंस्थेवर अपरिवर्तनीय परिणाम होऊ शकतात.