गोमन्तक डिजिटल टीम
आज रात्री ११ वाजल्यापासूनएक दुर्मिळ खगोलघटना आपल्याला दिसणार आहे.
आज मध्यरात्रीनंतर चंद्र शनी ग्रहासमोरून मार्गक्रमण करीत शनीला काही काळ आपल्या मागे लपवणार आहे
चंद्र, सूर्य ,पृथ्वी सामील असतात तेव्हा या घटनेला ग्रहण (Eclipse) म्हटले जाते. इतर ग्रहगोलांच्या बाबतीत या दुर्मिळ युतीला वैज्ञानिकदृष्ट्या ऑकल्टेशन म्हटले जाते.
चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आहे आणि त्याची जगभरात दोन अंशानी फरक दाखवते त्यामुळे जगातील अत्यंत मर्यादित भागात चंद्र आणि शनी यांची ही युती दिसेल.
पश्चिम आकाशात ४९.७० अंशावर, ००.१२ वाजता शनी चंद्राच्या मागे अदृश्य होईल. त्यानंतर १ वाजून २१ मिनिटांनी ३४.८ अंशावर, चंद्राच्या आडून शनी पुन्हा आकाशात अवतरेल.
आकाशाच्या विरुद्ध बाजूला गुरु ग्रह आपल्या चार चंद्रांसह त्याचदरम्यान दिसू शकेल. ही घटना आपल्याला दुर्बिणीतून पाहता येईल.
जुन्ता हाऊस-पणजी येथील सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळेत तसेच रवींद्र भवन मडगाव मध्येदेखील १४ ऑक्टोबर रोजी रात्री निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे