World Tourism Day: ..तर 'गोवा' वाटेल स्वप्नवत! काय ते जाणून घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटन

'जीवाचा गोवा’ करण्यासाठी येत असणाऱ्या पर्यटकांच्या गोव्याकडून काही अपेक्षाही आहेत.

वाढते दलाल

किनाऱ्यांवर दलालांकडून पर्यटकांची लुबाडणूक, फसवणूक होत आहे.

अंमलीपदार्थांचा विळखा

अंमलीपदार्थांच्या विळखा गोव्यात वाढत चालला आहे. सध्या सर्वच समुद्रकिनारे हे नायजेरियन, रशियन, इस्त्रायली विदेशींनी बळकावले आहेत.

सुरक्षा व्यवस्था

गुन्हेगारी व अंमलीपदार्थांच्‍या वाढत्‍या घटना तसेच पर्यटक संख्या पाहता सुरक्षा व्यवस्था सुधारणा अत्यावश्यक आहेत.

वाहतूक समस्या

ट्रॅफिक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, टॅक्सीसेवा सुधारणे तसेच खाजगी टॅक्सी सेवेचा पर्याय सक्षम करणे आवश्यक आहे.

प्रदूषण

समुद्रकिनाऱ्यांवरील ध्वनीसकट सर्व प्रकारचे प्रदूषण, उपद्रव यासारख्या समस्यांकडे प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज आहे.

सार्वजनिक उपद्रव

कचरा फेकणे, उघड्यावर जेवण बनवणे, अतिउत्साही लोकांचा उपद्रव या गोष्टींना आळा घातला पाहिजे.

खर्च नियंत्रणाची गरज

हॉटेलिंग, पार्किंग, रिसॉर्ट्स इथल्या किमतींवर योग्य नियंत्रण आणल्यास पर्यटन आणखी वाढण्यास नक्कीच मदत होईल.

October मध्ये का करावी Goa Trip? जाणून घ्या खास कारणे..

आणखी पाहा