गोमन्तक डिजिटल टीम
प्रत्येक ऋतूत गोव्याचे वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळते.
ऑक्टोबरमध्येसुद्धा तुमची गोवा ट्रिप खास बनेल. का ते पुढे वाचा.
मान्सून सिझन संपत आल्यामुळे सर्वत्र हिरवेगार वातावरण आहे आणि फार मोठ्या पावसाचा धोकाही नाही.
पावसाळा संपल्यामुळे स्वच्छ आकाश आणि गोव्याच्या सुंदरतेसोबत सूर्यकिरणांचा आनंद घेण्यासाठी हा योग्य सिझन आहे.
मान्सूनमध्ये खवळलेला समुद्र आता शांत झालेला असतो आणि किनारी भागात हॉटेल रिसॉर्ट्स पूर्ण क्षमतेने सुरु असतात.
किनारी भागात असणाऱ्या गार वाऱ्यांमुळे तुम्ही जादुई वातावरणात तुमची संध्याकाळ घालवू शकता.
पाऊस कमी आल्यामुळे आणि गणेशोत्सव संपल्यामुळे ताज्या माशांची चव चाखण्यासाठी हा योग्य काळ आहे.
नवरात्र दिवाळी झाल्यानंतर पर्यटकांची पावले गोव्याकडे वळू लागतात, त्या तुलनेने आता कमी गर्दी असते.