Akshata Chhatre
रेडिओने अनेक वर्षांपासून माहिती, मनोरंजन, आणि शिक्षण दिले आहे. 13 फेब्रुवारी हा दिवस 'जगभरात रेडियो दिवस' म्हणून साजरा केला जातो.
रेडिओचा जन्म 20 व्या शतकाच्या सुरुवातीला झाला. 1920 मध्ये पहिलं रेडिओ प्रसारण करण्यात आलं आणि त्यानंतर रेडिओ एक प्रभावी माध्यम बनला.
रेडिओचे वैश्विक प्रभाव लक्षात घेऊन या दिवसाशी 'रेडिओ आणि विविधता' यावर लक्ष केंद्रित केलं जातं.
रेडिओ स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर माहिती प्रसारित करतो. आजही संकटाच्या वेळी, उदाहरणार्थ, नैसर्गिक आपत्तीमध्ये रेडिओ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
रेडिओ केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर तो समाजातील विविध घटकांना जोडतो, विचारांची देवाणघेवाण करतो.
आजकाल डिजिटल रेडिओ, पॉडकास्ट, आणि ऑनलाईन रेडिओ सेवा आपल्या स्मार्टफोन्सद्वारे उपलब्ध आहेत.
रेडिओ हे एक महत्त्वाचे संवाद साधन आहे, जो एकाच वेळी सर्व लोकांपर्यंत पोहोचतो.