Akshata Chhatre
फोंडा मंगेशी मंदिराची जत्रा म्हणजे एक एक धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे.
मंगेशी मंदिर गोव्यातील एक महत्त्वपूर्ण शिव मंदिर आहे, ज्याला भक्तांकडून मोठ्या संख्येने भेट दिली जाते.
फोंडा तालुक्यात अनेक मंदिरं आहेत आणि पैकी आनंदाने साजरी केली जाणारी म्हणजे मंगेशाची जत्रा.
या दिवशी दरदिवशी प्रमाणेच विधीपूर्वक पूजा केली जाते आणि आकर्षक वेशभूषेत मंगेशला सजवलं जातं. फोंड्यातील मंगेशाची जत्रा भक्तीची झंकार आहे.
या दिवशी भजनांच्या गजरात, आणि वाद्यांच्या तालात भक्तिमय वातावरण निर्माण केलं जातं.
उत्सवातील रंग आणि गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने या मंदिराला भेट दिली पाहिजे.
मंगेशी फोंडा येथील श्री मंगेशाची जत्रा म्हणजे भक्तीचा एक अनोखा अनुभव आहे, हा गोव्याचा सांस्कृतिक समृद्धीचा वारसा आहे.