गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात काढलेले फोटो खासच दिसतात मग ते तुमचे असोत अथवा तिथल्या ठिकाणांचे. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्य जाणून घेऊया यामागचे रहस्य.
सोनेरी वाळू, निळेशार पाणी, होड्यांची रेलचेल, रिसॉर्ट्स या पार्श्वभूमीवर आणि विशेषकरून सूर्यास्तावेळी नयनरम्य फोटोज घेता येतात.
गोव्यातली जुनी घरे, हवेल्या, प्रार्थनास्थळे इथली रंगसंगती, रचना तुमच्या फोटोला खास बनवतील.
गोव्यातील जंगले, अभयारण्ये फिरताना योग्य खबरदारी घेऊन तुम्ही तुमच्या फोटोग्राफीला वाईल्डलाईफ टच देऊ शकता.
गोव्यातील सणउत्सवांमधून, कार्निव्हलमधून तुम्ही गोव्याची वैविध्यपूर्ण संस्कृती कॅप्चर करू शकता.
गोव्याच्या ग्रामीण भागातली हिरवीगार शेती, घरे, तिथले पोशाख, खाद्यसंस्कृती, मातीचे रस्ते तुमच्या फोटोमध्ये बहार आणतील.
इथली शहरे कॅफेज, रेस्टॉरंट्स, कसिनोज, क्रूझ पार्टीज, नाईट लाईफमुळे उत्साहाने भारावलेली असतात, या जगात तुमचे फोटोज आणखी रंगीबेरंगी दिसतील.
नद्या, किनारी प्रदेश, पठारे, धबधबे यांनी गोवा समृद्ध आहे. हा ग्रीन क्रोमा तुम्हाला फोटोत स्वर्गाची अनुभूती द्यायला पुरेसा आहे.
मुंबई गोवा महामार्गावरती असाल तर ढगांचा मुकुट मिरवणाऱ्या या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या!