मुंबई गोवा महामार्गावरती असाल तर ढगांचा मुकुट मिरवणाऱ्या या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या!

गोमन्तक डिजिटल टीम

श्री क्षेत्र मार्लेश्वर

सह्याद्री पर्वतराजीला भिडलेल्या संगमेश्वर तालुक्यात हे भगवान शंकराचे पवित्र व अद्भुत देवस्थान वसलेले आहे.

Shri Marleshwar Temple

नैसर्गिक गुहा

नैसर्गिक गुहेत श्री शंकरांचे अर्थात श्री मार्लेश्वराचे मंदिर आहे. हा गाभारा दिव्यांच्या प्रकाशात उजळलेला असतो.

Shri Marleshwar Temple

उंच कडेकपाऱ्या

उंच उंच कडेकपाऱ्या आणि ढगांच्या सोबतीने श्री मार्लेश्वराचा परिसर अत्यंत विलोभनीय दिसतो.

Shri Marleshwar Temple

धारेश्वर जलप्रपात

मंदिराच्या मागेच धारेश्वर हा उंच डोंगरांमधून ओतणारा धबधबा डोळे विस्फारून टाकतो.

Shri Marleshwar Temple

वन्यजीवांची सोबत

निबिड अरण्य, मोठाले वृक्ष यांसोबत इथे पक्षी, वन्यप्राणी आणि नागांचा भरपूर वावर आहे.

Shri Marleshwar Temple

कोकणचा कैलास

डोंगरांच्या भव्यतेमुळे, पावसाळ्यापासून मुख्य धारेश्वरसोबत असणारे असंख्य धबधबे आणि नीरव शांततेमुळे या परिसराला कोकणचा कैलास म्हणून ओळखतात.

Shri Marleshwar Temple

श्रावण विशेष

श्रावण महिन्यात श्री मार्लेश्वराचे दर्शन घ्यायला भरपूर गर्दी लोटते, श्रावण सोमवारी या देवस्थानात विशेष पूजा असते.

Shri Marleshwar Temple

जाण्यासाठी योग्य वेळ

श्रावणापासून हिवाळ्यापर्यंत इथे जाणे योग्य ठरते. आसपासच्या गावांचा नजारा या दरम्यान खास असतो.

Shri Marleshwar Temple

बाईकवरुन करा 'ऑफबीट गोव्याची' सफर

Goa Road
आणखी पाहा