गोमन्तक डिजिटल टीम
ओझोन थर वाचवण्यासाठी दरवर्षी १६ सप्टेंबरला World Ozone Day साजरा केला जातो.
ओझोन थर नष्ट करणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची आपण आज जागतिक ओझोन दिनी माहिती घेऊ.
जुन्या पद्धतीच्या AC ,फ्रिज युनिटमध्ये तसेच फोमिंग-पॅकिंग आणि दुर्गंधीनाशकांमध्ये CFC मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ते ओझोन थरासाठी धोकादायक आहे.
फायर एक्स्टिंग्विशर मध्ये आढळणारे हॅलॉन हे रसायन ओझोन थरासाठी त्रासदायक आहे.
कार्बन टेट्राक्लोराईडचा वापर करून बनणारे स्वच्छता घटक ओझोन थर कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात.
मिथाईल ब्रोमाईड असलेली पेस्टीसाईड्स ओझोनसाठी घटक ठरतात.
जागतिक समस्या होत चाललेले प्लास्टिकसुद्धा ओझोन थर कमी करण्यास मदत करते.
ओझोन थर वाचवणे हे मानवी जीवनासाठी आणि निसर्ग समतोलासाठी महत्वाचे आहे. आपण शक्य तितके प्रयत्न यासाठी केले पाहिजेत.