गोमन्तक डिजिटल टीम
नेचर जर्नलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यात भारताच्या नावावर एक नकोसा रेकॉर्डही नोंदवला गेला आहे.
भारत प्लास्टिक प्रदूषणात सर्वात मोठा योगदान देणारा देश बनला आहे.
जगात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापैकी एक पंचमांश कचरा फक्त भारतात निर्माण होतो.
दरवर्षी भारतात 93 कोटी टन इतका प्लास्टिक कचरा निर्माण होतो.
एकत्रित न होणारा कचरा आणि कचरा जाळण्याच्या सवयी प्रदूषण संकटाचे प्रमुख कारण आहेत.
भारतानंतर नायजेरिया, इंडोनेशिया आणि चीन हे सर्वाधिक प्रदूषण करणारे देश आहेत.
भारत प्लास्टिक प्रदूषणात दरडोई आधारावर 127 व्या क्रमांकावर आहे.
याबाबतची कारणे आणि उपाययोजनांकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.