Pramod Yadav
पावसाळ्यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव गोव्यात महत्वाचे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
दूधसागर पर्यटन सर्किटमध्ये वाहतुकीस गोवा वनविभागाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे.
गेल्यावर्षात येथे पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून सरकारकडून काळजी घेतली जाते.
तसेच, राज्यातील धबधबे, तळी आणि नद्यांसह चिरेखाणीत पोहण्यास बंदी घातली आहे.
पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाल्याने दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केलाय.
हा मनाई आदेश पुढील साठ दिवसांसाठी जारी करण्यात आला असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत.
धबधब्यांना भेट देण्यास बंदी नसली तरी पालकांना मुलांना धोक्याची पूर्वसूचना द्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले.