Manish Jadhav
भारत-चीन संघर्ष नवा नाहीये. मागील काही महिन्यांपासून सीमेवर तणावाची स्थिती आहे. याचदरम्यान, एक बातमी आली आहे.
चीनमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडल्याने साऱ्या जगाचं लक्ष या देशानं वेधलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1000 मेट्रीक टन इतक्या वजनाचा सोन्याचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.
हुनान प्रांतातील पिंगजियांगमध्ये हा सोन्याचा साठा सापडला आहे.
या साठ्याची सरासरी किंमत साधारण 600 बिलियन युआन म्हणजेच 6,91,473 कोटी रुपये इतकी सांगितली जातेय.
चीमध्ये सापडलेले हे सोन्याचे साठे पाहता दक्षिण आफ्रिकेतील साऊथ डीप माईनलाही चीन मागे टाकू शततो.
माहितीनुसार व्यापक 3D परीक्षण आणि खोलवर आणखी अधिक प्रमाणात सोन्याचे साठे असल्याचे संकेत इथे मिळतायेत.