Manish Jadhav
बीग बजेट चित्रपट बनवणे ही आजकाल सामान्य बाब झाली आहे. जेव्हा जेव्हा बिग बजेट चित्रपटांचा विचार केला जातो तेव्हा 'आदिपुरुष' आणि 'साहो'ची नावे सर्वाधिक ऐकायला मिळतात.
आज (8 सप्टेंबर) आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या समोर 'जवान', 'पठाण' हे चित्रपटही तुलनेत फिके पडतात.
हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. जगातील सर्वात महागड्या चित्रपटांच्या यादीत याचा समावेश आहे.
हा चित्रपट 1983 मध्ये रिलीज झालेल्या 'रिटर्न ऑफ द लेडी'चा सिक्वेल आहे आणि 'स्कायवॉकर' सागाचा सातवा चित्रपट होता. ज्याचे नाव 'स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स' होते.
'स्टार वॉर्स' चित्रपट (Star Wars Movie) द फोर्स अवेकन्स' आणि 'रिटर्न ऑफ द लेडी' नंतर तीस वर्षांनी प्रदर्शित झाला.
स्टार वॉर्स या बीग बजेट चित्रपटात हॅरिसन फोर्ड, मार्क हॅमिल, कॅरी फिशर, ॲडम ड्रायव्हर आणि डेली रिडल सारखे दिग्गज कलाकार आहेत.
या चित्रपटाचे बजेट अंदाजे $447 दशलक्ष म्हणजेच भारतीय चलनात 37,543,196,091.00 रुपये होते. याने जगभरात एकूण 2.07 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1,72,06,86,46,500 रुपये कमावले. यासोबतच त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले.