Sameer Amunekar
इनलँड तायपनला जगातील सर्वात विषारी साप मानलं जातं. त्याच्या विषाची तीव्रता (LD50) इतर सर्व सापांपेक्षा जास्त आहे.
हा साप प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील कोरड्या, दुर्गम भागांत आढळतो. मानवी वस्तीपासून तो लांब राहतो.
एका चाव्यातील विष अनेक प्रौढ माणसांना मारण्यासाठी पुरेसं असू शकतं. म्हणूनच तो सर्वात धोकादायक मानला जातो.
इतकं विषारी असूनही इनलँड तायपन सामान्यतः शांत असतो. धोका वाटल्याशिवाय तो चावत नाही.
उंदीर व लहान सस्तन प्राणी खाऊन तो पर्यावरणातील समतोल राखतो.
मानवी चावे फार कमी नोंदवले गेले आहेत. मात्र चावा बसल्यास विष वेगाने परिणाम करतं. तत्काळ उपचार आवश्यक.
वेळेत योग्य अँटीव्हेनम मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता खूप जास्त असते.