गोमन्तक डिजिटल टीम
पद्म भूषण आणि पद्म विभूषण या पुरस्कारांनी सन्मानित भारतातील नामी उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाल्यानं देशभरातून शोक व्यक्त केला जातोय.
रतन टाटा यांच्या आयुष्याच्या विविध पैलूंवर सध्या चर्चा केली जातेय आणि यांपैकीच एक म्हणजे त्यांची अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी.
असं म्हणतात रतन टाटा जेव्हा लॉस एंजलसच्या आर्किटेक्चर कंपनीमध्ये काम करायचे तेव्हा त्यांना एक मुलगी पसंत पडली होती, मग असं काय झालं जेणेकरून टाटा आजन्म अविवाहित राहिले आज जाऊन घेऊया.
लॉस एंजलसमध्ये भेटलेल्या मुलीसोबत टाटा लग्न करणार होते मात्र सात वर्षांपासून आजारी असलेल्या त्यांच्या आजीची तब्येत खराब झाल्याने त्यांना भारतात परतावं लागलं.
टाटा यावेळीच त्या मुलीला सोबत घेऊन येणार होते मात्र तिच्या पालकांनी याला विरोध केला.
वर्ष १९६२ मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध सुरु होतं आणि म्हणूनच मुलीच्या पालकांना तिचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. त्या एका निर्णयामुळे रतन टाटा यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली ती कायमचीच.