Manish Jadhav
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी उलटी गिनती सुरु झाली आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरु केली आहे.
आयसीसीच्या या मेगा स्पर्धेपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्धही मालिका खेळणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी लवकरच टीम इंडियाचीही घोषणा होणार आहे.
येत्या काही दिवसांत टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांच्या 15 सदस्यीय अंतरिम संघाची घोषणा करायची आहे (जे बदलू शकते). यानंतर 13 फेब्रुवारीपर्यंत सर्व संघ आपापल्या संघात बदल करु शकतात. आयसीसी 13 फेब्रुवारीला सर्व संघ जाहीर करेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी निवडलेल्या टीम इंडियात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन होऊ शकते. शमी सध्या नेटमध्ये गोलंदाजीचा कसून सराव करत आहे.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ओपनिंग करु शकतात. शुभमन गिलला बॅकअप सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरु शकतो. केएल राहुल, श्रेयस अय्यर यांना चौथ्या क्रमांकावर स्थान दिले जाऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी/अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.