Akshata Chhatre
सध्या पुरुष आणि स्त्रिया एकत्र काम करतायत, किंबहुना एकसारखं काम करतायत. म्हणजे काय तर आपण दिवसांतील अधिकाधिक काळ ऑफिसमध्ये घालवतो.
एवढावेळ ऑफिसमध्ये घालवल्यानंतर नक्कीच याचा शाररिक आणि मानसिक परिणाम आपल्यावर होणं साहजिक आहे. तर मग चला जाणून घेऊया ऑफिसमध्ये स्वतःची काळजी कशी घेता येईल.
काम करताना तुम्ही कसे बसता हे सर्वात महत्वाचं आहे. काम करताना स्क्रीन तुमच्या डोळ्यांसमोर असणं महत्वाचं आहे. काम करताना नीट न नसल्याने पाठीचे आणि मानेचे आजार होऊ शकतात.
तुम्ही सतत जर का एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर हे बरोबर नाही. अधून मधून ब्रेक घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. दर ३० मिनिटांनी उभं राहा, चालून या यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.
काम करताना अनेकवेळा आपल्याकडून पाणी पिणं राहून जातं. सध्या बराच उकाडा वाढलाय त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवणं बरंच महत्वाचं आहे हे लक्षात घ्या.
काम करताना अनेकवेळा भूक लागते. अशावेळी उपाशी न राहता काही ना काही खाणं महत्वाचं आहे मात्र यावेळी तुम्ही एखादं फळ किंवा नट्स खा. घरी बनवलेलं अन्न जेवा यामुळे शरीराला पोषण मिळेल.
पुन्हा पुन्हा स्क्रीन बघून डोळ्यांवर ताण येतो आणि डोळे कोरडे पडू शकतात, त्यामुळं दर २० मिनिटांनी किमान २० सेकंदांचा ब्रेक महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा.