Akshata Chhatre
उन्हाळ्यात घाम, ऊन आणि उष्णतेमुळे केस कोरडे, गळणारे आणि निस्तेज होतात. केसांना नैसर्गिक ताकद देण्यासाठी योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे.
आंबा हे फळ व्हिटॅमिन A आणि C युक्त आहे. हे केसांची मुळे बळकट करतो आणि स्कॅल्पला नैसर्गिक ओलावा मिळतो.
नारळाचं पाणी उन्हाळ्यातील निर्जलीकरण टाळतो. नारळाचं पाणी केसांना मऊपणा व चमक देतं आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत मिळते.
यांमुळे केसांची वाढ सुधारते, केसांची गळती कमी होते आणि स्कॅल्पची त्वचा आरोग्यदायी राहते.
हिरव्या भाज्यांमुळे स्कॅल्पला ऑक्सिजन पोहोचतो. केसांची मुळे बळकट होतात आणि केसात नैसर्गिक चमक येते,
अंड्यांमुळे केसांची वाढ वेगाने होते आणि केस अधिक घनदाट आणि मजबूत होता. स्कॅल्पला पोषण मिळते.
ही फळं केसांना मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि उन्हाळ्याचा त्रास होत नाही, परिणामी केसांची नैसर्गिक रंगत टिकून राहते.