Workout Mistakes: सावधान! व्यायाम करताना 'या' चुका करताय? वाढू शकतो गुडघेदुखीचा त्रास

Sameer Amunekar

वॉर्म-अप न करता थेट व्यायाम सुरू करणे

व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराला आणि स्नायूंना तयार करणे गरजेचे असते. वॉर्म-अप न केल्यास गुडघ्यांचे सांधे जकडून दुखापत होण्याची शक्यता वाढते.

Workout Mistakes | Dainik Gomantak

चुकीच्या पद्धतीचे स्क्वॅट्स करणे

स्क्वॅट्स किंवा लंजेस करताना गुडघे पायाच्या अंगठ्याच्या पुढे जाऊ नयेत. पोश्चर चुकल्यास संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर येतो आणि ते दुखू लागतात.

Workout Mistakes | Dainik Gomantak

क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे

स्नायू बळकट होण्याआधीच जिममध्ये खूप जड वजन उचलल्याने गुडघ्यांच्या सांध्यांवर आणि कार्टिलेजवर (कुर्चा) अतिरिक्त ताण पडतो.

Workout Mistakes | Dainik Gomantak

चुकीच्या शूजचा वापर करणे

व्यायाम करताना योग्य ग्रिप आणि गादी (Cushioning) असलेले शूज नसतील, तर धावताना किंवा उड्या मारताना लागणारा झटका थेट गुडघ्यांपर्यंत पोहोचतो.

Workout Mistakes | Dainik Gomantak

कडक आणि सपाट जमिनीवर धावणे

सिमेंट किंवा डांबरी रस्त्यावर सतत धावल्याने गुडघ्यांवर 'हाय इम्पॅक्ट' पडतो. शक्यतो धावण्यासाठी ट्रॅक किंवा गवताचा वापर करावा.

Workout Mistakes | Dainik Gomantak

'नो पेन, नो गेन' चा अतिरेक करणे

व्यायाम करताना गुडघ्यात थोड्याही वेदना जाणवल्या तर शरीर थांबण्याचा इशारा देत असते. याकडे दुर्लक्ष करून व्यायाम सुरू ठेवल्यास गंभीर दुखापत होऊ शकते.

Workout Mistakes | Dainik Gomantak

व्यायामानंतर स्ट्रेचिंग न करणे

वर्कआउट संपल्यानंतर 'कूल डाऊन' आणि स्ट्रेचिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्ट्रेचिंग न केल्याने पायाचे स्नायू ताणलेले राहतात, ज्याचा थेट परिणाम गुडघेदुखीवर होतो.

Workout Mistakes | Dainik Gomantak

तांदळाच्या पिठात 'या' 2 गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावा

Glowing skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा