Sameer Amunekar
महागड्या पार्लर ट्रीटमेंटपेक्षा स्वयंपाकघरातील तांदळाचे पीठ त्वचेला नैसर्गिक निखार देण्यासाठी उत्तम मानले जाते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
तांदळाच्या पिठात फक्त कच्चे दूध (Raw Milk) आणि मधाचे (Honey) काही थेंब मिक्स करा. हे मिश्रण कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी अमृतासारखे काम करते.
तांदळाच्या पिठामध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. दूध आणि मधासोबत हे पीठ चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) सहज निघून जातात.
कच्च्या दुधामुळे त्वचेवरील पिगमेंटेशन आणि टॅनिंग कमी होते, तर तांदळाचे पीठ चेहऱ्यावरील काळे डाग फिकट करून रंग उजळण्यास मदत करते.
मघामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला हायड्रेट ठेवतात. या फेस पॅकच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेचा सैलपणा दूर होतो.
हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटे ठेवा. पॅक हलका सुकल्यानंतर हातावर थोडे पाणी घेऊन चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये (Circular Motion) मसाज करत चेहरा धुवून घ्या.
आठवड्यातून फक्त २ वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला पार्लरच्या महागड्या फेशिअलपेक्षाही उत्तम रिझल्ट मिळेल आणि त्वचा कोरियन 'ग्लास स्किन'सारखी चमकेल.