Akshata Chhatre
रिकामा सब्जेक्ट असलेला ईमेल दुर्लक्षित राहतो. स्पष्ट आणि संक्षिप्त शब्दांत विषय सांगणारी एखादी ओळ द्या.
वर्क ईमेलमध्ये कॅज्युअल शब्दांचा वापर टाळा. यामुळे तुम्ही प्रोफेशनल आहात याची समोरच्याला खात्री पटेल.
राग, उपहास किंवा तणाव शब्दप्रयोग टाळा. नम्र, स्पष्ट आणि व्यावसायिक भाषेत संवाद ठेवा.
चुकीचे स्पेलिंग, वाक्य रचना चुकीची असणं याचा समोरच्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे ईमेल पाठवण्याआधी नेहमी तो मेल पुन्हा वाचून पहा.
सगळ्यांना ईमेल पाठवणं टाळा. फक्त संबंधित व्यक्तींनाच इमेल पाठवा Reply All हा ऑप्शन वापरताना काळजी घ्या.
ईमेलचा शेवट 'Thanks', 'Regards', 'Sincerely' अशा शब्दांनी करा. यामधून तुमची अदबी दिसते, आणि समोरचा खुश होतो.