Akshata Chhatre
सोलताना अंड फुटतंय? चिंता करू नका हे काही स्मार्ट ट्रिक्स तुमच्यासाठी आहेत.
पाण्यात थोडं मीठ किंवा व्हिनेगर टाका, यामुळे अंडी सहजपणे फुटत नाहीत आणि सोलताना अडचणही येत नाही.
शिजवलेली अंडी थंड पाण्यात १० मिनिटं ठेवा. यामुळे अंड सोलायला जास्ती त्रास लागत नाही.
अंड्याला टेबलवर हलकेच ठेचत सर्व बाजूंनी क्रॅक करा, मग अंड सहज सोलता येतं.
एक अंड छोट्या काचेच्या बरणीत टाका, थोडं पाणी घाला आणि हलवा यामुळे अंड सोलणं झटपट होतं.