Akshata Chhatre
कधी मस्करी, कधी सल्ला म्हणून दिले जाणारे शब्द महिलांच्या मनात खोलवर जातात. जरा थांबा, विचार करा, काय बोलत आहात ? हे जाणून घ्या
रात्री उशिरा बाहेर राहणं ही फक्त काळजीची गोष्ट नाही, ती तिची जबाबदारी आणि स्वातंत्र्य आहे, त्यामुळे एखादवेळेस ती उशिरा आली तर टोचून बोलू नका.
एखाद्या स्त्रीचं आयुष्य, करिअर, स्वप्नं यांचा विचार न करता फक्त लग्नाचा विषय काढून तिला त्रास होईल अशा गोष्टी करू नका.
शरीरावर केलेल्या सहज टिप्पण्या फार काळ मनात राहतात. तिचं शरीर म्हणजे चर्चेचा विषय नाही.
"शेवटी स्वयंपाकघरच संभाळावं लागणार!" असं म्हणून तिच्या स्वप्नांचा अपमान करू नका.
"तुझे कपडे फार विचित्र असतात!" असं म्हणून तिला हिणवू नका. कपडे म्हणजे अभिव्यक्ती. तिचा पोशाख म्हणजे तिची निवड आहे.