Akshata Chhatre
पावसात भिजणं ही केवळ मजा नाही, तर नैसर्गिक उपचारपद्धत देखील आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना?
पावसाचं पाणी शरीरातील उष्णता कमी करतं. त्वचेवरील मरण पेसींना स्वच्छ करतं. फोड, मुरुमं, रक्तदाब यांवर हा एक नैसर्गिक उपाय आहे.
पावसात भिजल्याने एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात परिणामी तणाव कमी होतो, मूड सुधारतो आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं
पावसाच्या पाण्याने शरीरातील अति उष्णता कमी होते यामुळे सिस्ट, हृदयविकार, मेंदूचा झटका यांचा धोका कमी होतो.
पावसाचं पाणी त्वचेचं पीएच संतुलन राखतं. त्वचेला नैसर्गिक चमक आणि गुळगुळीतपणा मिळतो
पहिल्या पावसात भिजताना प्रदूषणाची शक्यता असते. ज्यांना सर्दी, ताप किंवा अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांनी सावधगिरीने पावसात भिजावं