झाडावर सुतारकाम करणाऱ्या या पक्ष्याविषयी या गोष्टी माहितेयत का?

Rahul sadolikar

सुतारपक्षी

एक आकर्षक पक्षी. सुतार पक्ष्यांचा समावेश पिसिफॉर्मिस गणाच्या पिसिडी कुलात केला जातो. या कुलात सु. ३० प्रजाती आणि सु. २०० जाती आढळून येतात. भारतात सुतार पक्ष्याच्या सु. १३ प्रजाती आणि सु. २३ जाती आढळून येतात.

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

23 प्रजातींपैकी सोनेरी पाठीचा सुतार पक्षी डायनोपियम बेंगॉलेन्सिस भारतात सर्वत्र आढळतो. सदाहरित वनांत, झाडाझुडपांत, आमराईत, नारळांच्या बागेत, शुष्क प्रदेशांत तसेच शहरांतदेखील त्याचा वावर असतो.

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

सुतारपक्षी हे नाव

अन्न मिळवण्यासाठी तसेच घरटे करण्यासाठी तो एखाद्या सुताराप्रमाणे झाडाच्या खोडावर ‘ठक् ठक्’ असा आवाज करीत लाकूड पोखरतो आणि घरटे तयार करतो. म्हणून त्याला ‘सुतार पक्षी’ हे नाव पडले असावे.

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

सुतार पक्षी सामान्यपणे जोडीने किंवा लहान गटांत आढळतात. क्वचित ते अन्य पक्ष्यांच्या घोळक्यांत दिसून येतात. अन्न मिळविण्यासाठी ते जमिनीवर उतरतात किंवा आकाशात उड्डाण करतात. ते मुख्यत: खोडातील, फांद्यांतील भुंगेऱ्याच्या अळ्या काढून खातात.

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

सुतारपक्ष्याचे अन्न

कधीकधी मुंग्या, वाळव्या, मकरंद इ. खातात. सुतार पक्ष्याचा वावर बहुधा झाडांवर असतो. त्याच्या बोटांवर असलेल्या अणकुचीदार नखांनी तो खोडाला घट्ट पकडून सरसर वर चढतो.

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

अजब तंत्र

वर चढताना तो वळणे घेत चढत राहतो आणि शेंड्यापाशी पोहोचल्यावर उडून दुसऱ्या झाडाच्या खोडावर जाऊन बसतो. झाडावर चढत असताना तो चोचीने सालीवर भराभर घाव घालून ती फोडतो आणि आतील अळ्या खातो.

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

सुतारपक्ष्याची जीभ

सुतार पक्ष्याची चोच व जीभ वैशिष्ट्यपूर्ण असते. चोच छिन्नीप्रमाणे असून तो चोचीनेच झाडाचे लाकूड पोखरतो व घरटे बनवितो. जीभ चोचीच्या तिप्पट लांब असून काटेरी व टोकदार असते. तिच्यावर लाळेचा चिकट स्राव असतो.

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

शरीररचना

जीभ कवटीच्या आतल्या भागातून मानेपर्यंत जाऊन डोळ्याच्या खोबणीतून कंठिकांग या अस्थीला जुळलेली असते. कंठिकांगाला स्नायू जोडलेले असतात. ते नळीसारखे असून जिभेला आधार देते व आवरण तयार करते. कंठिकांग गलोलीच्या रबराप्रमाणे काम करून जिभेची हालचाल घडविते

Woodpecker facts and information | Dainik Gomantak

270 अंशात मान फिरवणाऱ्या एकमेव पक्ष्याविषयी चला जाणून घेऊ

owl | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी