270 अंशात मान फिरवणाऱ्या एकमेव पक्ष्याविषयी चला जाणून घेऊ...

Rahul sadolikar

घुबड

स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत. जगभरात घुबडाच्या 200 पेक्षा अधिक जाती आहेत. भारतात त्यांच्या आठ-दहा प्रजाती आढळतात. घुबडे भक्षक पक्षी आहेत; ती लहान प्राण्यांना ठार करून खातात. तरीही वैज्ञानिक त्यांचे नाते ससाणा व शिकरा अशा भक्षक पक्ष्यांच्या जवळचे आहे असे मानत नाहीत.

owl Facts and Information | Dainik Gomantak

पांढरे भारतीय घुबड

भारतात सामान्यपणे पांढरे घुबड आढळते. त्याचे शास्त्रीय नाव टायटो आल्बा आहे. त्याचबरोबर शृंगी घुबड आणि मासे खाणारे तपकिरी घुबडही आढळते. साळुंकीएवढे लहान घुबडही भारतात सर्वत्र आढळते. महाराष्ट्रात याला पिंगळा म्हणतात.

owl Facts and Information | Dainik Gomantak

घुबडांचं अन्न

घुबडे लहान सस्तन प्राणी खातात. तसेच ती पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे, कीटक आणि कृमीदेखील खातात. कृतक प्राण्यांचा त्यांच्या आहारात प्रमुख समावेश असतो. मोठ्या आकाराची घुबडे काही वेळेला सशासारखे प्राणी उचलून नेतात. काही उथळ पाण्यातील मासे खातात. ससाण्याप्रमाणे घुबडे मोठ्या आकाराचे भक्ष्य तुकडे करून खातात. परंतु भक्ष्य लहान असल्यास ते अखंड गिळतात.

owl Facts and Information | Dainik Gomantak

शरीररचना

घुबडांचे शरीर आखूड व भरीव असते. सर्व जातींच्या घुबडांचे डोके मोठे, चेहरा बशीसारखा पसरट आकाराचा असतो. डोळ्यांभोवती पिसांचे वलय असते. कान डोक्याच्या कडेला असून ते वर-खाली (समान पातळीवर नसतात) आणि पिसांखाली झाकलेले असतात. चेहऱ्यावरील विशिष्ट पोताच्या पिसांमुळे कानाकडे आवाज केंद्रित होतो. त्यामुळे आवाज कोठून येतो त्याची केवळ क्षितिजसमांतर दिशा नव्हे ,तर आवाजाचा स्रोत किती वर-खाली आहे याचाही अंदाज त्यांना करता येतो

owl Facts and Information | Dainik Gomantak

सर्वात लहान घुबड

एल्फ आउल हे जगातील सर्वांत लहान घुबड मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळते. त्याची लांबी सु. १५ सेंमी. असते. सर्वांत मोठया घुबडाचे नाव ग्रेट ग्रे आउल असून त्याची लांबी सु. ७२ सेंमी. असते. या जातीची घुबडे यूरोप, आशिया व उत्तर आफ्रिकेत आढळतात.

owl Facts and Information | Dainik Gomantak

डोळ्यांची रचना

डोळे इतर पक्ष्यांप्रमाणे कडेला नसून समोरच्या दिशेला आणि विस्फारलेले असतात. म्हणून ती एकाच क्षणी दोन्ही डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहू शकतात. परंतु माणसाचे डोळे जसे खोबणीत फिरतात तसे घुबडांचे डोळे फिरत नाहीत. एखादी हालणारी वस्तू पाहावयाची असल्यास त्यांना डोके फिरवावे लागते

owl Facts and Information | Dainik Gomantak

170 अंश फिरणारी मान

मानेतील मणक्यांच्या विशिष्ट रचनेमुळे घुबडे त्यांचे डोके क्षितिजसमांतर 270 पर्यंत आणि वर-खाली 180 पर्यंत फिरवू शकतात. डोळ्यांतील निमेषक पटल पारदर्शी असून ते डोळे ओले व स्वच्छ ठेवते. एखादया भक्ष्यावर घुबड झडप घालते तेव्हा त्याचे डोळे पापण्यांनी झाकले जातात. त्यामुळे डोळ्यांना सहसा इजा होत नाही

owl Facts and Information | Dainik Gomantak

पिसांचा तुरा आणि शिंगे

चोच मजबूत असून गळासारखी वळलेली असते. पाय मजबूत असून बोटांवर तीक्ष्ण नख्या असतात. काही घुबडांच्या डोक्यावर पिसांचा तुरा असल्यामुळे शिंगे (शृंगे) असल्याचा भास होतो. या पिसांचा वापर करून ते मादीला आकर्षित करीत असावेत किंवा त्यांच्या जातीच्या इतर घुबडांना ओळखण्यासाठी वापर करीत असावेत, असा अंदाज आहे. लांब, मऊ व हलक्या पिसांमुळे हा पक्षी जेवढा असतो त्याहून मोठा वाटतो.

owl Facts and Information | Dainik Gomantak

घुबडांना रात्रीचे दिसते...

सर्व घुबडांना रात्रीच्या काळोखात त्यांना चांगले दिसते आणि ते रात्री शिकार करतात. अन्य भक्षक पक्ष्यांच्या तुलनेने घुबडे कमी वेगाने उडतात; परंतु ती वेगाने देखील उडू शकतात. उडणाऱ्या पिसांच्या कडांची विशिष्ट दातेरी रचना असल्यामुळे त्यांच्या उडण्याचा आवाज कमी होतो. भक्ष्य पकडण्यासाठी घुबडे त्यांच्या अंगी असणाऱ्या केवळ उत्कृष्ट दृष्टिक्षमतेवर अवलंबून राहत नाहीत, तर ऐकण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतात

owl Facts and Information | Dainik Gomantak

वाळवंटातल्या जहाजाच्या या गोष्टी माहितेयत का?

Camel | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी