Pranali Kodre
वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला (WPL 2024) 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
डब्ल्यूपीएलचा यंदा दुसरा हंगाम असणार आहे. गेल्यावर्षी पहिल्या हंगामाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पसंती मिळाली होती.
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या पाच संघात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहे. या पाच संघांच्या कर्णधारांबद्दल जाणून घेऊ.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व भारताची अष्टपैलू हरमनप्रीत कौर करणार आहे. तिच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने डब्लूपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.
दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची दिग्गज मेग लेनिंग करणार आहे. तिने डब्लूपीएल 2023 स्पर्धेतही या संघाचे नेतृत्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली संघ उपविजेता ठरला होता.
युपी वॉरियर्स संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली करणार आहे. तिने डब्लूपीएल 2023 मध्येही या संघाचे नेतृत्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
रॉयल चॅलेंजर्स संघाचे नेतृत्व भारतीय फलंदाज स्मृती मानधना करणार आहे. तिने डब्लूपीएल 2023 मध्येही या संघाचे नेतृत्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली हा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला होता.
डब्लूपीएल 2023 मध्ये अखेरच्या क्रमांकावर राहिलेल्या गुजरात जायंट्सचे नेतृत्व यंदा ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी करण्यास सज्ज आहे. डब्लूपीएल 2023 मध्ये तिने सुरुवातीला नेतृत्व केले, पण ती दुखापतीमुळे पूर्ण हंगाम खेळू शकली नव्हती. तिच्या जागेवर स्नेह राणाने नेतृत्व केले होते.