Sameer Amunekar
महिलांच्या आरोग्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा असतो. योग्य भाज्या खाल्ल्यास महिलांचे संपूर्ण आरोग्य सुधारते, हॉर्मोनल संतुलन राखले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत आणि कोणत्या टाळाव्यात.
भोपळा आणि दुधी भोपळा हे दोन्ही महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत, विशेषतः पचनसंस्था आणि वजन नियंत्रणासाठी.
दोडकी ही एक अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारी भाजी आहे. महिलांसाठी ती खास उपयुक्त ठरते कारण ती पचनसंस्था सुधारते, वजन नियंत्रण ठेवते आणि शरीराला डिटॉक्स करते.
तोंडली ही एक अत्यंत पौष्टिक भाजी आहे आणि महिलांसाठी विशेषतः वजन नियंत्रण, पचन सुधारणा, आणि हाडांसाठी फायदेशीर ठरते.
बटाटा हा सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ आहे, पण तो खाण्यासंबंधी अनेक गैरसमज आहेत. योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे खाल्ल्यास तो पौष्टिक आणि फायदेशीर ठरू शकतो, पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही समस्या उद्भवू शकतात.
टिंडा, भेंडी, गाजर या भाजांच देखील महिलांनी सेवन केलं पाहिजे. हाडांसाठी आणि साखर नियंत्रणासाठी या भाज्या उत्तम आहेत.
कच्च्या भाज्या किंवा गाजर-बीट वगैरेंचा रस टाळणेच महिलांसाठी फायद्याचं आहे. काही जणांना कच्च्या भाज्यांमधील फायबर आणि एन्झाइम्स पचवताना त्रास होतो, ज्यामुळे गॅस, सूज आणि अॅसिडिटी होऊ शकते.