Sameer Amunekar
सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उन्हात जाऊ नये. बाहेर गेल्यास हलके, सुती आणि सैलसर कपडे परिधान करावेत. टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा.
लहान मुलांना वारंवार पाणी, नारळपाणी, ताक, सोलकढी, लिंबूपाणी द्यावे. कोल्ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूस टाळावेत; याऐवजी ताजे फळांचे रस द्यावेत.
पचायला हलके, घरगुती आणि ताजे अन्न द्यावे. ताज्या फळांचा आहारात समावेश करावा – टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, आंबा. तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थ कमी करावेत. थंडगार ताक, दही आणि लस्सी आहारात असावेत.
घरातील खोलीत पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास कुलर किंवा फॅनचा योग्य वापर करावा. गरम पाणी टाळून कोमट किंवा गारसर पाण्याने आंघोळ घालावी.
उन्हात जास्त वेळ खेळू देऊ नये, संध्याकाळी किंवा सकाळी लवकर बाहेर पाठवावे. खेळताना पुरेसं पाणी प्यायला द्यावं. जड व्यायाम टाळावा, हलकी फुलकी अॅक्टिव्हिटी निवडावी.
घामोळ्यांसाठी चंदन पावडर किंवा गुलाब पाणी वापरावे. जुलाब किंवा उलट्या झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डिहायड्रेशनची लक्षणे (ओठ सुकणे, चक्कर येणे) जाणवली तर ORS किंवा साखर-मीठ-पाणी द्यावे.