Akshay Nirmale
या वर्षात गोव्यातील जंगलांमध्ये वणव्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यात वनसंपदेचे नुकसान झाले होते.
या आगी मानवनिर्मित आहेत की नैसर्गिक याबाबत मतमतांतरे आहेत. पण, अनेक जंगलात आगीचे प्रकार घडल्याने संपूर्ण राज्यात हा प्रश्न गाजाल होता.
आता मात्र गोव्यातील जंगलांवर ड्रोन द्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. एकूण 8 ते 10 ड्रोनद्वारे गोव्यातील जंगलांवर नजर ठेवली जाईल.
यासाठी 31 डिसेंबरपर्यंत 600 ट्रॅकर्सना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वन मंत्री विश्वजीत राणे यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे महिलांनाही ड्रोन कसा चालवायचा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आमदा मित्र आणि आपदा सखी यांची मदत अशा कामात घेणार असल्याचीही माहिती मंत्री राणे यांनी दिली आहे.
अभयारण्यांमधील हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.