गोव्यातील नाईट लाईफ अनुभवायची असेल तर 'येथे' द्या भेट...

Akshay Nirmale

Smugglers inn

येथे युरोपीयन स्टाईल लाऊंज बार आहे. येथे मोठ्या स्क्रीनवर चित्रपट दाखवतात. मद्याचा आस्वाद घेत चित्रपट पाहता येतो. याशिवाय गेम्स, कराओके साँग्जही येथे असतात. ब्रिटिश फूडही येथे मिळते.

Goa Night Life | Dainik Gomantak

लक्झरी नाईट क्रुझ

गोव्यातील नाईट क्रुझवर मल्टी कुझिन बुफे ट्राय करता येऊ शकतो. तसेच येथे म्युझिकवर तुम्ही थिरकू शकता आणि भूक लागेल तेव्हा उत्कृष्ट भोजनाचा आस्वादही घेऊ शकता.

Goa Night Life | Dainik Gomantak

कॅसिनो पाम्स

लास वेगास येथील कॅसिनोज चित्रपटात पाहिलेले असतात. तो अनुभव येथे घेता येईल. नॉर्थ गोव्यातील ला कॅलिप्सो हॉटेलमध्ये कॅसिनो पाम्स आहे. येथे अनेक कॅसिनो गेम्समध्ये पैसे जिंकण्यासाठी लक ट्राय करता येईल.

Goa Night Life | Dainik Gomantak

टिटोज

हा गोव्यातील सर्वात जुन्यापैकी एक नाईट क्लब आहे. १९७१ मध्ये हा क्लब सुरू झाला. येथे रॉक, हिपहॉप अशा पाश्चिमात्य संगीतावर तुम्ही थिरकू शकता. आवडीप्रमाणे बॉलीवूड साँग्जही असतात. येथे बारही आहे. बागा बीचजवळ हा क्लब आहे.

Goa Night Life | Dainik Gomantak

सायलेंट नॉईज क्लब

पाळोले येथील या क्लबमध्ये म्युझिकचे विविध जॉनर उपलब्ध आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकाला हेडफोन सेट दिला जातो. ते कानाला अडकवून यंगस्टर्स येथे डान्स करत असतात. म्युझिक आणि खानपानासाठी हा क्लब प्रसिद्ध आहे.

Goa Night Life | Dainik Gomantak

बांबू फॉरेस्ट

गोव्यातील वाईल्ड नाईटलाईफ अनुभवण्यासाठी हणजुणे येथील बांबू फॉरेस्ट येथे जाता येऊ शकते. द लास्ट हिप्पी स्टँडिंग या चित्रपटाचे शुटिंग येथे झाले आहे. येथे ओपन एअर पार्टीही होत असते.

Goa Night Life | Dainik Gomantak

सॅटर्डे नाईट फ्ली मार्केट

हडपदे येथील सॅटर्डे नाईट फ्ली मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. दर शनिवारी सायंकाळी सहा ते मध्यरात्रीपर्यंत हे मार्केट सुरू असते. येथे कपडे, दागिने, फूड, कारपेट असे बरेच काही मिळते. येथे फिरणे हा देखील मस्त अनुभव असतो.

Goa Flea Market | Dainik Gomantak
Sara Ali Khan | Dainik Gomantak