Sameer Amunekar
मेकअपमुळे त्वचेचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे मुरुम, डाग आणि त्वचाविकार होऊ शकतात. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणं अत्यावश्यक आहे.
स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश तुमच्या झोपेची गुणवत्ता कमी करतो आणि चेहऱ्यावर डार्क सर्कल्स निर्माण होतात.
अतिशय घट्ट किंवा नायलॉनचे कपडे घालून झोपल्याने त्वचेला हवा मिळत नाही आणि स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सॉफ्ट कॉटनचे आरामदायक कपडे घालावेत.
मोकळे केस झोपेत गुंततात, तुटतात आणि केसगळती वाढते. केस हलक्या वेणीत बांधून झोपावं.
झोपण्याच्या अगदी आधी तळलेले, मसालेदार किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो आणि चेहऱ्यावर फुगवटा येऊ शकतो.
दिवसभरात पाणी कमी घेतल्यास त्वचा कोरडी, निस्तेज होते. मात्र झोपण्याच्या अगदी आधी भरपूर पाणी पिणं टाळा – मध्यम प्रमाणात पाणी प्या.