Sameer Amunekar
दिवसभरातील अनुभव, भावना, विचार यांचे वर्गीकरण आणि साठवणूक झोपेत मेंदू करतो. हे करताना स्वप्न पडतात.
जे विचार आपण जाणीवपूर्वक दडपून टाकतो, ते झोपेत अवचेतन मनातून बाहेर येतात आणि स्वप्न रुपात दिसतात.
चिंता, आनंद, दु:ख, भीती अशा भावना झोपेत मनावर प्रभाव टाकतात आणि त्याचे प्रतिबिंब स्वप्नात उमटते.
जुने अनुभव आणि नवीन शिकवण या दोहोंचे संमिश्रण म्हणजे अनेकदा स्वप्न. मेंदू आठवणी सुरक्षित करताना त्या दृश्यरूपात दिसू लागतात.
जेव्हा शरीर किंवा मन थकलेले असते, तेव्हा विचित्र किंवा अधिक तीव्र स्वरूपाची स्वप्ने येण्याची शक्यता वाढते.
Rapid Eye Movement Sleep ही झोपेची अवस्था सर्वात स्वप्नप्रधान असते. मेंदू अत्यंत सक्रिय असतो आणि त्यावेळी बहुतेक स्वप्न पडतात.