who is Medhavi Bidhuri: फिरकी गोलंदाजी, Gen-Z स्टाइल सेलिब्रेशन अन् सौंदर्याची चर्चा; मेधवी बिधुरी नेमकी आहे तरी कोण?

Sameer Amunekar

कोण आहे मेधवी बिधुरी?

मेधवी बिधुरी ही दिल्लीची युवा महिला क्रिकेटपटू असून ती उजव्या हाताने लेग-स्पिन गोलंदाजी करते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

who is Medhavi Bidhuri | Dainik Gomantak

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सहभाग

मेधवी यापूर्वीही दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळली आहे. २०२५ मध्ये ती ‘साउथ दिल्ली सुपरस्टार्स’ संघाचा भाग होती, तर २०२६ मध्ये ती ‘सेंट्रल दिल्ली क्वीन्स’कडून खेळत आहे.

who is Medhavi Bidhuri | Dainik Gomantak

सलामीच्या सामन्यात चर्चेत

‘वुमन्स दिल्ली प्रीमियर लीग २०२६’च्या सलामीच्या सामन्यात मेधवीच्या गोलंदाजीपेक्षा तिच्या विकेट सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

who is Medhavi Bidhuri | Dainik Gomantak

सेलिब्रेशन व्हायरल

विकेट घेतल्यानंतर मेधवीने केलेल्या खास ‘६-७’ सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये तिची चर्चा सुरू झाली.

who is Medhavi Bidhuri | Dainik Gomantak

११ टी-२० सामन्यांत ११ विकेट

मेधवीने आतापर्यंत ११ टी-२० सामन्यांत ११ विकेट घेतल्या आहेत. तिची सर्वोत्तम कामगिरी २० धावा देत ३ विकेट अशी आहे.

who is Medhavi Bidhuri | Dainik Gomantak

प्रभावी इकॉनॉमी रेट

मेधवीचा टी-२० क्रिकेटमधील इकॉनॉमी रेट ६.६८ इतका आहे. लेग-स्पिन गोलंदाज म्हणून तिची ही आकडेवारी लक्षवेधी मानली जाते.

who is Medhavi Bidhuri | Dainik Gomantak

सेलिब्रेशनमुळे मिळाली ओळख

सलामीच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नसला, तरी मेधवीच्या गोलंदाजीसह तिच्या हटके ‘६-७’ सेलिब्रेशनने सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

who is Medhavi Bidhuri | Dainik Gomantak

रक्षाबंधनाला घरीच बनवा 10 मिनिटांत सुंदर राखी!

येथे क्लिक करा