Kami Rita Sherpa: ‘माउंटन मॅन’ने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड; पुन्हा रचला नवा इतिहास

Manish Jadhav

स्वतःचा विक्रम मोडला

नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी माउंट एव्हरेस्टवर चढण्याचा स्वतःचा विक्रम मोडला. कामी रिता शेर्पा यांनी बुधवारी 30व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करुन नवा इतिहास रचला आहे.

Kami Rita Sherpa | Dainik Gomantak

सर्वाधिक चढाई करण्याचा विक्रम

शेर्पा यांनी जगातील सर्वात उंच शिखरावर सर्वाधिक वेळा चढाई करण्याचा नवा विक्रम केला आहे. या यशाबद्दल जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Kami Rita Sherpa | Dainik Gomantak

सकाळी 7:49 वाजता पोहोचले

मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:49 वाजता 8,849 मीटर शिखरावर पाय ठेवला होता.

Kami Rita Sherpa | Dainik Gomantak

1994 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केलं

नेपाळचे वृत्तपत्र द हिमालयन टाइम्सनुसार, कामी रीता शेर्पा यांनी 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 12 मे रोजी 29व्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली. शेर्पा यांनी 1994 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती.

Kami Rita Sherpa | Dainik Gomantak

1992 पासून गिर्यारोहण सुरु केले

शेर्पा यांनी औपचारिकपणे 1992 मध्ये गिर्यारोहण सुरु केले असले तरी, यावर्षी ते सपोर्ट स्टाफ म्हणून सर्वोच्च शिखर सर करण्याच्या मोहिमेत सामील झाले होते. तब्बल दोन वर्षांनी एव्हरेस्टवर चढाई करण्यात त्यांना यश आले.

Kami Rita Sherpa | Dainik Gomantak

‘माउंटन मॅन’

कामी रीता शेर्पा यांना लहानपणापासूनच पर्वत आणि दऱ्यांमध्ये फिरण्याची आवड होती. जवळपास तीन दशकांपासून ते असे विक्रम करत आहेत. यामुळेच त्यांना ‘माउंटन मॅन’ असेही म्हटले जाते.

Kami Rita Sherpa | Dainik Gomantak

शेर्पा यांची कमाल!

शेर्पा यांनी केवळ एव्हरेस्टवर चढाई करण्यातच यश मिळवले नाही तर माऊंट K2, चो ओयू, ल्होत्से आणि मनास्लूवरही त्यांनी आपल्या देशाचा ध्वज फडकावला आहे.

Kami Rita Sherpa | Dainik Gomantak
America President Joe Biden | Dainik Gomantak