Sameer Amunekar
सावंतवाडीचा गारवा, तलावाचं सुंदर दृश्य आणि शांत वातावरण हिवाळ्यात अजूनच मोहक होतं. फोटोसाठी आणि संध्याकाळच्या फिरण्यासाठी उत्तम आहे.
हिवाळ्यात समुद्र शांत असतो, त्यामुळे बोटिंगसाठी बेस्ट सीझन. किल्ल्याची सफर आरामात करता येते. ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण.
समुद्र आणि करंबोली नदीचा संगम… हिवाळ्यात हवा स्वच्छ आणि थंड असल्याने दृश्य अप्रतिम दिसतं! वॉटरस्पोर्ट्स हेसुद्धा उत्तम.
वेंगुर्ला येथील बंदरावरून समुद्राचं सुंदर रूप पाहायला मिळतं.
आंबोली हे थंड वातावरणासाठी प्रसिध्द आहे. येते हिवाळ्याच्या दिवसात थंडी तसंच मोठ्या प्रमाणात धुक पाहायला मिळतं.
येथे विजयदुर्ग किल्ला पाहण्यासारखा आहे. समुद्राच्या काठावर असलेला हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक आहे.
रेडी बीचवर शांत समुद्राचा आनंद घेता येतो. येथील प्रसिध्द गणपती पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.