Akshata Chhatre
आवळ्याचे तुकडे, १ इंच आले आणि १०-१२ कढीपत्ता पाने थोड्या पाण्यात घालून मिक्सीमध्ये बारीक वाटून घ्या आणि गाळून प्या.
आवळ्यात मुबलक व्हिटॅमिन-सी असते. हे मुरुमांचे डाग कमी करते, त्वचा उजळवते आणि केस पांढरे होण्यापासून रोखते.
आले रक्ताभिसरण वाढवते. यामुळे स्कॅल्पला पोषण मिळते आणि केसांची वाढ वेगाने होते.
कढीपत्त्यात लोह आणि व्हिटॅमिन-ए असते. हे केस गळती कमी करून केसांना नैसर्गिक चमक प्रदान करते.
हे ज्यूस दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि त्वचेवर वेगळीच चमक येते.hair fall control
क्रीम किंवा शॅम्पूवर पैसे खर्च करण्याऐवजी या नैसर्गिक पेयामुळे तुम्हाला कायमस्वरूपी आणि सुरक्षित निकाल मिळतील.
हिवाळ्यातील कोरडेपणाला नैसर्गिकरित्या हरवा. आजच हे सोपे 'हेल्थ ड्रिंक' तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा!