Akshata Chhatre
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. या चित्रपटात रणवीर सिंहपेक्षाही जास्त प्रेम अक्षय खन्नाला मिळत आहे.
त्याचे दमदार ॲक्टिंग, खास डान्स मूव्ह्स आणि हटके हेअरस्टाईल खूप गाजतेय. मात्र, अक्षय खन्नाचे हे आकर्षक दिसणारे केस खरे नसून, त्याने विग वापरला आहे.
एका मुलाखतीत अक्षय खन्नाने सांगितले होते की, त्याला वयाच्या १९-२० व्या वर्षांपासूनच केस गळतीची समस्या सुरू झाली होती. ही समस्या इतकी वाढली की तरुण वयातच त्याला टक्कल पडले.
एलोपेसिया ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामुळे केस खूप वेगाने गळतात आणि त्या ठिकाणी नवीन केस येत नाहीत. यामुळे कोणत्याही वयात व्यक्तीला टक्कल पडू शकते आणि याचा परिणाम प्रामुख्याने स्कॅल्पवर दिसतो.
एलोपेसियामुळे डोक्यावरील, भुवयांवरील, पापण्यांवरील किंवा शरीराच्या इतर भागांवरील केस गळू शकतात.
एलोपेसियावर स्टिरॉइड इंजेक्शन, मिनोक्सिडिल किंवा फोटोथेरपीसारखे काही उपचार उपलब्ध आहेत, जे प्रतिकारशक्ती सुधारतात आणि केसांची वाढ वाढवतात.
पण यावर स्थायी इलाज करणे अजूनही कठीण आहे.