Sameer Amunekar
अंघोळीनंतर त्वचा किंचित ओली असतानाच नारळाचे तेल लावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि कोरडेपणा कमी होतो.
नैसर्गिक कोरफडीचे जेल त्वचेला थंडावा देते. त्वचेचा रखरखीतपणा कमी करण्यासाठी आणि मऊपणा टिकवण्यासाठी याचा वापर करू शकता.
शिया बटरमध्ये फॅटी अॅसिड्स असतात. ते त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार करून ओलावा टिकवण्यास मदत करते.
ग्लिसरीन हे ह्युमेक्टंट आहे. ते वातावरणातून आणि त्वचेच्या आतील थरातून ओलावा आकर्षित करून त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
बदामाच्या तेलातील फॅटी अॅसिड्स त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करतात. विशेषतः हात-पायांच्या कोरड्या भागांवर याचा वापर करता येतो.
सेरामाइड्स, ग्लिसरीन किंवा हायलुरॉनिक अॅसिड असलेले मॉइश्चरायझर निवडा. अंघोळीनंतर त्वचा थोडी ओली असतानाच ते लावल्यास ओलावा टिकतो.
टाच, कोपर, गुडघे आणि हातांच्या अतिशय कोरड्या भागांवर पेट्रोलियम जेली लावा. त्वचेतील ओलावा बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी ती मदत करते.