Sameer Amunekar
थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी दिवसातून दोन वेळा चांगले मॉइश्चरायझर लावा.
चेहरा धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर टाळा. कोमट पाणी वापरा, त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकण्यास मदत होते.
हिवाळ्यातही UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा.
थंडीमध्ये तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज असते. त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.
चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल टिकवण्यासाठी सौम्य आणि त्वचेला अनुकूल फेसवॉश वापरा.
थंडीमध्ये ओठ फुटणे आणि डोळ्यांभोवतीची त्वचा कोरडी होणे सामान्य आहे. ओठांना लिप बाम आणि डोळ्यांभोवती योग्य मॉइश्चरायझर लावा.
संत्रे, आवळा, गाजर, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या खा. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत होते.