Sameer Amunekar
सफरचंदातील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
सफरचंदातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
सफरचंदातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.
सफरचंदातील विरघळणारे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.
सफरचंदातील फायबरमुळे साखरेचे शोषण हळू होते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मेंदूच्या पेशींच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.
सफरचंदातील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.