Sameer Amunekar
थंडीमध्ये त्वचा कोरडी होत असल्याने हार्श फेसवॉश टाळा. सौम्य, हायड्रेटिंग क्लेंझरने चेहरा धुवा, जे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते.
अल्कोहोल-फ्री टोनर वापरा. हे त्वचेचा pH बॅलन्स राखते आणि पुढील स्किनकेअर प्रॉडक्ट्स त्वचेत नीटरीत्या शोषले जातात.
हिवाळ्यात हायालुरॉनिक अॅसिड, ग्लिसरीन किंवा नायसिनामाइडयुक्त सीरम ओलावा लॉक करण्यासाठी बेस्ट असतात. त्वचेला त्वरित ग्लो मिळतो.
थंडीत डोळ्यांखालील त्वचा नाजूक होते. पफीनेस, ड्रायनेस आणि डार्क सर्कल कमी करायला आय क्रीम मदत करते.
हिवाळ्यात हलका क्रीम पुरेसा नसतो. शिया बटर, सेरामाइड्स किंवा व्हिटॅमिन E असलेला मॉइश्चरायझर रात्री वापरा, जे त्वचेवर संरक्षणात्मक लेयर तयार करतो.
ओठ आणि हात सर्वात लवकर कोरडे पडतात. रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम आणि हँड क्रीम जरूर लावा.
७–८ तासांची झोप त्वचेची नेचरल रिपेअर प्रोसेस वाढवते. झोप पूर्ण असेल तर त्वचा सकाळी ताजीतवानी, मऊ आणि ग्लोईंग दिसते.