Sameer Amunekar
हिवाळ्यात तापमान कमी असल्याने लोणी सहज वितळत नाही. ते बाहेर ठेवले तरी सुरक्षित राहते आणि लावायलाही सोपे होते.
गूळ थंड हवेत ताजाच राहतो. फ्रिजमध्ये ठेवल्यास तो कडक होतो, त्यामुळे हिवाळ्यात तो बाहेर ठेवणेच योग्य.
मधाला फ्रिजची गरज नसते. थंडीतही त्याची चव आणि गुणधर्म अबाधित राहतात. उलट फ्रिजमध्ये ठेवल्यास तो साखरेसारखा जमा होतो.
हे पदार्थ थंड, कोरड्या जागेत जास्त काळ टिकतात. फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची टेक्स्चर आणि चव बिघडू शकते.
खूप कमी तापमानात ब्रेड फ्रिजमध्ये कोरडा होतो. थंडीत तो खोलीच्या तपमानावर ठेवला तरी अनेक दिवस ताजा राहतो.
हिवाळ्यात नैसर्गिकरित्या हवामान कोरडे असल्याने लोणची बाहेर ठेवली तरी खराब होत नाहीत. मीठ व मसाल्यांमुळे ती टिकाऊ असतात.
बदाम, काजू, मनुका, पिस्ते थंड हवेत सहज खराब होत नाहीत. हवेपासून बंद डब्यात ठेवल्यास ते बराच काळ ताजे राहतात.