Sameer Amunekar
खोबरेल तेल त्वचेत सहज मुरते आणि दीर्घकाळ मॉइश्चर लॉक करून ठेवते. त्यामुळे कोरड्या हिवाळ्यात सुद्धा त्वचा मऊ व हायड्रेट राहते.
हिवाळ्यात चेहर्याची त्वचा पटकन कोरडी पडते. खोबरेल तेल त्वचेत खोलवर शोषले जाऊन मॉइश्चर लॉक करते आणि त्वचा नैसर्गिकरीत्या हायड्रेट ठेवते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलक्या हातांनी तेलाने मसाज करा. सकाळी त्वचा मऊ, तजेलदार आणि फ्रेश दिसते.
हिवाळ्यात नाक, ओठाच्या कडा, गाल याठिकाणी ड्राय पॅचेस दिसतात. खोबरेल तेलामुळे ते कमी होऊन त्वचा स्मूथ होते.
थंडीत त्वचा संवेदनशील होते. खोबरेल तेलातील गुणधर्म सूज, लालसरपणा आणि स्किन इरिटेशन कमी करण्यास मदत करतात.
खोबरेल तेल चेहऱ्यावर एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करते, ज्यामुळे थंडी, धूळ आणि प्रदूषणाचा दुष्परिणाम कमी होतो.
हिवाळ्यात केमिकल मेकअप रिमूव्हरने त्वचा आणखी कोरडी पडते. खोबरेल तेलाचा वापर केल्यास मेकअप सहज निघतो आणि त्वचा मॉइश्चरायझ्ड राहते.
लिप बामऐवजी झोपण्यापूर्वी ओठांवर खोबरेल तेल लावल्यास ओठ फुटण्याची शक्यता कमी होते आणि ओठ मऊ व गुलाबी राहतात.