Sameer Amunekar
थोडंसं तूप आणि बारीक साखर मिसळून ओठांवर हलका स्क्रब करा. मृत त्वचा निघून ओठ मऊ आणि नैसर्गिकरित्या ग्लोइंग होतात.
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. झोपण्यापूर्वी ओठांवर लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या.
रोज 3-4 वेळा नारळ तेल लावल्याने ओठांतील कोरडेपणा दूर होतो. मुलांसाठी देखील सुरक्षित उपाय.
ओठांवर शुद्ध अॅलोव्हेरा जेल लावा. सूज, वेदना आणि लालसरपणा कमी करते.
पाकळ्या दुधात भिजवून पेस्ट बनवा आणि ओठांवर लावा. रंगत वाढते तसेच ओठ पोषक घटक शोषून घेतात.
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचा आणि ओठ लगेच कोरडे पडतात. दिवसाला किमान 8 ग्लास पाणी आवश्यक.
आर्टिफिशियल सुगंध किंवा रंग असलेल्या उत्पादनांमुळे नुकसान होऊ शकते. शक्यतो नैसर्गिक किंवा ऑर्गेनिक लिप बामच निवडा.